आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:पुणे येथील भिडेवाड्याची तत्काळ दुरुस्ती करा; विविध संघटनांचे निवेदन

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे मुलींची पहिली शाळा भिडे वाड्यात सुरू केली होती. या एेतिहासिक वास्तूची दुरवस्था झाली असून भिडेवाड्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी येथील विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधी तहसीलदारांतर्फे मंगळवारी (दि.१०) मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, पुणे येथील ऐतिहासिक भिडे वाडा काळाच्या ओघात शिकस्त झाला आहे. त्याच्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्र्यांनी या वास्तूची जोपासना व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावे. यासंदर्भात राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करावी. निवेदनावर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष बी. एस. कापसे, कार्याध्यक्ष अनिल सगर, उपाध्यक्ष भूमिपुत्र वाघ, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदीप जाधव, कार्याध्यक्ष माधवराव जाधव, शहराध्यक्ष विशाल माने, विजयाताई वाघ, सुवर्णा उगाले, हरिदास इंगळे, रज्जाक अत्तार, राहुल कांबळे, पुतळाबाई ब्याळबोगे, महाराष्ट्र लोक विकास मंच, महिला राजसत्ता आंदोलन, जिजाऊ ब्रिगेड, संघटनांचे पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...