आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:नगरपरिषद हद्दीतील शौचालयांची दुरुस्ती करावी; मुख्याधिकाऱ्यांना युवक काँग्रेसचे निवेदन

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक शौचालयांची दूरवस्था झाली असून नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कळंब नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याची मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंधरा दिवसात शहरातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करुन ते पूर्ववत नागरिकांसाठी सोयीचे करावेत. अन्यथा या शौचालयांवरील वार्षिक लेखापरीक्षण अहवाल तपशील काढून हा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडण्यात येईल. शौचालयांची दुरुस्ती केली नाही तर युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. निवेदनावर उस्मानाबाद कळंब विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष भय्या निरफळ, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ताहेर शेख, बप्पा उबाळे, युवक काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष रोहित कसबे, बबन हैसलमल, मोहिन तांबोळी, इरशाद सय्यद, सिद्धेश्वर खैरमोडे, लखन मोहिते, रामलाल मोहिते, सादिक बबलू शेख, संतोष गंगोत्री, आकाश कुचेकर, हरुण बागवान यांच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...