आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करा अन्यथा टोल बंद करू ; भाजपच्या वतीने टोल व्यवस्थापनास निवेदन

वाशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रं. ५२ ची तत्काळ दुरुस्ती करा अन्यथा टोल नाका बंद करू, असा इशारा वाशी तालुका भाजपच्या वतीने टोल व्यवस्थापनाला देण्यात आला. यासंबंधी बुधवारी (दि.३१) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील तेरखेडा परिसर ते पारगाव, असा जवळपास ३० किलोमीटर महामार्ग तालुक्यात येतो. याची अवस्था गावातील रस्त्यासारखी झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे काही दिवसांपूर्वी पारडी फाट्याजवळ एका कारला अपघात होऊन दुसऱ्या बाजुला उडाली होती. यामध्ये चौघे गंभीर जखमी झाले होते. यावर महामार्ग देखभाल करणाऱ्या संबंधितांकडून खड्ड्यात माती भरण्याचा प्रकार घडला होता. तसेच संपूर्ण ३० किलोमीटरच्या अंतरात अवजड वाहनांच्या ओझ्याने रस्त्यावर चकारी पडल्या आहेत.

यामुळे चालकाचा अचानक ताबा सुटून अपघात घडत आहेत. अचानक मोठे वाहन आडवे येत असल्याने दुचाकीस्वार अपघातात बळी पडत आहेत. याबाबत बुधवारी भाजप तालुकाध्यक्ष सचिन इंगोले यांनी पारगाव टोलनाका व्यवस्थापक भोसले यांना निवेदन दिले. ९ सप्टेंबरपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करुन राष्ट्रीय महामार्ग वापरण्यायोग्य करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

बातम्या आणखी आहेत...