आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतफेड:जिल्हा बँकेचे कर्ज घेऊन परतफेड; 78 लाख रुपयांच्या वसुलीसाठी कार्यकारी संचालकाचा दंडनाईक यांच्या घरासमोर ठिय्या

उस्मानाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेचे कर्ज घेऊन परतफेड केली नसल्याने बँकेने कर्ज वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. त्यानुसार गुरुवारी बँकेचे कार्यकारी संचालक विजय घोणसे पाटील यांनी भाजपचे नेते विजय दंडनाईक यांच्या घरासमोर ठिय्या दिला. गेल्या दहा दिवसांपासून इतर कर्मचारी तेथे बसून होते.

आता पर्यंत १२ कोटी रुपयांचे कर्ज वसूल करण्यात आले. गेल्या दहा दिवसांपासून ठिय्या देऊनही दंडनाईक यांनी दुर्लक्ष केल्याने स्वत: कार्यकारी संचालक घोणसे पाटील या वसुलीसाठी सत्याग्रहात सामील झाले. ३० सप्टेंबर २०१० रोजी दंडनाईक यांनी वसंतदादा उस्मानाबाद तालुका दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संघ या माध्यमातून ३९ लाखांचे कर्ज घेतले होते. त्याचे आता व्याजासह तब्बल ७८ लाख रुपये झाले आहेत. यापैकी एक छदामही बँकेला आतापर्यंत भरला नाही. म्हणून हा सत्याग्रह सुरु करण्यात आला. जेथे सत्याग्रह करुनही वसुली होऊ झाली नाही, अशा ठिकाणी बँड पथक लावून वसुली करण्यात येणार आहे. दंडनाईक यांनी किती रुपये भरले अथवा काय आश्वासन दिले हे रात्री उशिरापर्यंत बँकेकडून कळू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...