आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांकडून स्वागत:येलगट्टेंची बदली, वसुधा फड नव्या मुख्याधिकारी ;  बदलीच्या स्थगितीची चर्चा

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी गंगाखेड येथून बदलून आलेल्या वसूधा फड यांची वर्णी लागली. फड यांनी शुक्रवारी पदभार घेतला, त्यानंतर त्यांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सत्कार करुन स्वागत केले.

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती आल्याची चर्चा होती. पालिका पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपून ११ महिने उलटले. पालिकेवर प्रशासक असून, मुख्याधिकारीच पालिकेवर प्रशासक आहेत.

हरिकल्याण येलगट्टे यांनी ११ महिने प्रशासक म्हणून कारभार पाहिला.त्यांची बदली झाली असली तरी नवीन ठिकाणी त्यांना पोस्टिंग मिळालेली नाही. मात्र, त्यांच्या जागी गंगाखेड येथून बदलून आलेल्या वसूधा फड शुक्रवारी रुजू झाल्या असून, त्यांनी पदभार घेतल्यानंतर पालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. दरम्यान,दिवसभरातील घडोमाडीनंतर सायंकाळी येलगट्टे यांची बदली स्थगित झाल्याची चर्चा पालिकेत सुरू झाली. त्यामुळे बदली प्रकरणात नेमका कोणता गोंधळ सुरू आहे, यासंदर्भात मुख्याधिकारी येलगट्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बदली झालीच नसल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...