आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अहवाल तयार; जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला‎ विचारली अनियमितता रक्कमेसह दोषींची नावे

धाराशिव‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिकेत मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात घोटाळे‎ झाले असून याची चौकशी सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या‎ आदेशानुसार ५३ दिवस चार सदस्यीय समितीने चौकशी‎ करुन अंतरिम अहवाल सादर केला. त्यात दोषी‎ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे व अनियमितता केलेल्या‎ रकमेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन‎ ओंबासे यांनी पालिकेला पत्र पाठवले असून आगामी काही‎ दिवसांत ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे‎ मुख्याधिकाऱ्यांकडून कळाले.‎

शिवसेना जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी‎ जिल्हाधिकाऱ्यांकडे नगरपालिकेत झालेला गैरकारभार,‎ भ्रष्टाचार व अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी‎ केली होती. त्यानुसार ओंबासे यांनी चार सदस्यीय समिती‎ स्थापून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.‎

मोठे मासे लागणार‎ गळाला‎
या प्रकरणात नगरपालिकेतील‎ मोठे मासे गळाला लागणार‎ असल्याचे समजते. कारण यात‎ मागील काही वर्षीच्या प्रकरणांची‎ चौकशी करण्यात आली आहे.‎ त्यामुळे आजी-माजी कर्मचारी‎ अधिकाऱ्यांसह काही अन्य‎ जणांना फटका बसणार‎ असल्याची चर्चा आहे.‎ नगरपालिकेकडून दोषींची नावे‎ जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यावर या‎ प्रकरणावरील सर्व पडदा उठणार‎ असल्याचे समजते.‎

लवकरच माहिती देणार
मी मुंबईला असल्याने मला ही माहिती संकलित‎ करुन देणे शक्य झाले नाही. तसेच आलेले पत्रही‎ मला नुकतेच बघायला मिळाले. पत्राच्या आधारे‎ लवकरच माहिती देण्यात येईल.‎ -वसुधा फड, मुख्याधिकारी.‎

पालिकेडून अद्यापही कारवाई नाही‎
जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मिळाल्यानंतर‎ पालिकेला दोषींची नावे आणि अनियमिततेच्या‎ रकमेची माहिती पत्र देऊन मागवली आहे. त्यास‎ दहा दिवस होऊनही पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना‎ ही माहिती दिली नाही. ही माहिती मिळाल्याशिवाय‎ वरिष्ठ कार्यालयाकडून यावर कारवाई होणार‎ नसल्याचे संकेत मिळत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...