आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय क्षयनियंत्रण कार्यक्रम:क्षय रुग्णांची माहिती कळवा आणि पाचशे रुपये मिळवा; उपजिल्हा रुग्णालयाकडून केले आवाहन

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्षयरोग बरा होऊ शकतो, अशी जनजागृती झाली असली तरीही हा आजार लपवण्याचा सर्वसामान्यांचा कल वाढता आहे. त्यामुळे या आजाराचे वेळीच निदान व्हावे व रुग्णांना क्षयमुक्त होता यावे यासाठी राष्ट्रीय क्षयनियंत्रण कार्यक्रमाचे अंतर्गत खासगी वैद्यकीय सेवेतील डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय व कोणताही पगार न घेणाऱ्या व्यक्तीने क्षयरूग्ण कळवा व ५०० रुपये मिळवा योजनेला प्रतिसाद दिल्यास क्षयरोगाचा बिमोड करणे सोपे होईल.

खासगी रुग्णालयात वा डॉक्टरांकडे जे रुग्ण क्षयरोगावरील उपचार घेण्यासाठी जातात, त्या रुग्णांची नावे नर्स,वॉर्डबॉय व कोणताही पगार न घेणाऱ्या व्यक्तीने क्षयनियंत्रण कक्षास कळवल्यावर प्रत्येक रुग्णामागे पाचशे रुपये देण्यात येणार आहे. डॉक्टरांप्रमाणे क्षयरुग्णांनाही पाचशे रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. योजनेमुळे नोंदणीकृत या गटात मोडणारा हा आजाराचे किती रुग्ण आहेत, त्यांना वैद्यकीय उपचार मिळतात की नाही हे पाहणे सुलभ होईल, असा या योजनेचा उद्देश आहे. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये येणाऱ्या क्षयरुग्णांची संपूर्ण माहितीची नोंद केली जाते. मात्र काही सामाजिक दडपणामुळे अनेकदा औषधे खासगी रुग्णालय येथून घेण्याकडे कल असतो.

खाजगी रुग्णालयात महागडी वैद्यकीय उपचारपद्धती व औषधांचा खर्च झेपत नसतानाही क्षयरोग लपवण्यासाठी हा मार्ग स्वीकारला जातो. त्यामुळे रुग्णांची नोंद होत नाही. खासगी वैद्यकीय सेवांतून उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती संकलित करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. क्षयरुग्णांना आजार बरा होऊ शकतो हा दिलासा देण्याचे कामही पुढील टप्प्यात समुपदेशकांच्या मदतीने करण्यात येणार असल्याचे क्षयरोग नियंत्रण कक्ष व शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विक्रम आळंगेकर यांनी सांगितले.

पोलिओबरोबरच क्षयरोगाच्या शून्य केसेस करण्याकडे शासनाचा कल आहे. यासाठी आरोग्य मंत्रालयाने सर्वच विभागांना कडक आदेश दिले असून शहर अथवा ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी कोणीही क्षयग्रस्त राहू नये यासाठी वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. यात सोशल मिडियाचा वापर करण्याचे आवाहन आहे.

बातम्या आणखी आहेत...