आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने स्पर्धा समितीतर्फे रविवारी (दि ५) आयोजित भव्य सूर्यनमस्कार स्पर्धेत उमरगा शहरासह परिसरातील मुले, युवक, युवती व महिला-पुरुष अशा एकूण ४६७ स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदविला. या स्पर्धा शहरातील हुतात्मा स्मारक येथे घेण्यात आल्या. या स्पर्धा युवक, युवती, महिला अन पुरुष अशा आठ गटात घेण्यात आल्या.
एकूण २४ पारितोषिक स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांचे उपस्थित वितरण करण्यात आले. यासाठी व्यापारी आणि नागरिकाकडून आर्थिक योगदान देण्यात आले. स्पर्धेनिमित्त सहभागी आरएसएसचे जेष्ठ कार्यकर्ते मुरलीधर मुगळीकर, डॉ. अनिकेत इनामदार, ऑल इंडिया ॲंटिकरप्शन बोर्ड प्रदेश अध्यक्ष सविताताई व्हंडरे, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रेखा सूर्यवंशी, बळीराम सुरवसे, गिरीश सुरवसे, प्रा. एन. जे. पवार आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी व्यवस्था टीम स्वच्छता ही सेवा,सिंहगर्जना परिवार,शिवनेरी प्रतिष्ठान व शालेय क्रीडा व योग शिक्षकांचा सहयोग लाभले. स्पर्धेच्या नियोजनासाठी महादेव भोसले, मंगेश गिरी, महेश पाटील, आनंद मेरू, आनंद जाधव, सुरेंद्र झिंगाडे, लक्ष्मण दासमे, रामदास कुलकर्णी, गोपाळ आष्टे, रोहन जाधव, दत्ता पवार व इतरांचे योगदान लाभले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.