आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या दिनानिमित्त डीबीटी स्टार कॉलेज अंतर्गत महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संशोधनपर पोस्टर प्रदर्शन सादर केले.या दिनानिमित्त एकूण ४० पोस्टर सादर केले गेले होते. या पोसटर्सच्या माध्यमातून विविध संशोधने सादर करण्यात आली. याचे मूल्यमापन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबाद येथील रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. मेघशाम पाटील, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील डॉ. शिवाजी जेटीथोर आणि परंडा येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ.सचिन चव्हाण हे परीक्षक म्हणून लाभले होते.
पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य माननीय नानासाहेब पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर पोस्टर प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मुळीक प्रिया, द्वितीय क्रमांक चाकूरकर अमिता ,तृतीय क्रमांक अनिकेत शिंदे त्याचबरोबर गुंड वैष्णवी, घुले स्वप्नाली ,कांबळे महेश गायकवाड रोहिणी, साखरे अपेक्षा शिंदे ऋतुजा, वीर नूतन, माने स्वाती महामुनी स्वरांजली इत्यादी विद्यार्थी विद्यार्थिनींनी सर्वोत्कृष्ट संशोधन करून विशेष प्राविण्य मिळविले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डीबीटी स्टार कॉलेजचे समन्वयक डॉ. संदीप देशमुख यांनी केले सूत्रसंचालन डॉ. स्वाती जाधव आणि प्रा. मंगेश भोसले तर आभार डॉ. बाबासाहेब मोरे आणि डॉ. वनंजे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शांतिनाथ घोडके व सर्व विज्ञान शाखेतील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.