आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:100  ग्रामपंचायतींचे विधवा प्रथाबंदीचे ठराव सुपूर्द

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वराज फाउंडेशन मार्फत भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील तब्बल १०० ग्रामपंचयातींद्वारे घेण्यात आलेले विधवा प्रथा बंदी ठराव जिल्हाधिकारी यांना सुपूर्द करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने राज्यात सर्वप्रथम या प्रथेविरोधात ठराव घेऊन स्त्रीमुक्ती लढ्यात एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक परिपत्रक जारी करून सर्व ग्रामपंचायतींना यासबंधीचा ठराव घेण्यासंदर्भात आवाहन केले होते.

या आवाहनाला साद देत वैशालीताई मोटे यांच्या अध्यक्षतेखाली भूम, परंडा, वाशी मतदारसंघात कार्यरत असणाऱ्या विश्वराज फाउंडेशनच्या वतीने जनजागृती केली. त्याला प्रतिसाद देत आतापर्यंत तब्बल १०० ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंदी बाबत ठराव घेण्यात आले आहेत. ते सर्व ठराव फाउंडेशनच्या अध्यक्ष वैशालीताई मोटे यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष अमोल औताडे, उपाध्यक्ष आमीर शेख, सचिव पांडुरंग देवळकर, दादासाहेब गायकवाड, डॉ सूरज मोटे, मयूर जाधव, प्रदीप शेळके, जयंत यादव, अमोल घोळवे, अविनाश आटोळे, उदयसिंह राजे जाधव, श्रावण आसलकर, सचिन पाटील, बालाजी गटकळ, किरण सुरवसे, संपत काटवटे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...