आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:किसान क्रांती परिषदेस शेतकऱ्यांचा प्रतिसाद

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, कृषिपंपांना दिवसा १२ तास विद्युत पुरवठा करावा, पीकविमा न नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी नेते विनायकराव पाटील, शुभम केदारी, केशव मदने व ग्रामस्थांच्या वतीने बुधवारी किसान क्रांती परिषद घेण्यात आली. मान्यवर म्हणाले की, शासन शेतीचे खासगीकरण करण्याच्या विचारात आहे. यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सावध व्हावे. वीजटंचाई, कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, शेती मालाचे हमीभाव, ऊसाची एफआरपी आदी समस्या सोडवण्याकरिता शेतकऱ्यांनी एकत्रित येण्याचे आवाहन राज्याच्या विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी केले.

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना शेतीच्या समस्या सोडवण्यासाठी एकजूट होण्याचे आवाहन भ्रमण ध्वनीद्वारे केले. यावेळी जितेंद्र शिंदे, शुभम केदारी, सिकंदर शहा, रवींद्र इंगळे, अमर बिराजदार, विजयकुमार सोनवणे आदींनी मत व्यक्त केले. या किसान क्रांती परिषदेला राज्यातील यवतमाळ, सातारा, अमरावती, धुळे, सांगलीसह विविध भागातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी भरवलेल्या परिषदेला राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किसान क्रांती परिषदेस बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, शिकंदर शहा, कृषिभूषण गोविंदराव पवार, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, विजयकुमार सोनवणे, रवींद्र इंगळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शेतकरी विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले तर कमलाकर भोसले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

रक्तापेक्षा माणुसकीचे नाते श्रेष्ठ
स्वतःच्या स्वार्थासाठी रक्ताच्या नात्यात अंतर वाढू लागले आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजातील दुःखितांना मायेचा आधार देण्याची गरज आहे. नाईचाकूर येथील केशव मदने याच्या शेतकरी आई-वडिलांनी आत्महत्या केली.

आई वडिलांचे छत्र हरवलेल्या केशवचे शिक्षण व नोकरीची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचे लग्न करून जबाबदारी पार पाडणार. आळे फाटा येथील शुभम केदारी या मुलाच्या वडिलांनी पंतप्रधानांच्या वाढदिवशी शेतमालाला हमीभावाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. शुभमचे शिक्षण, लग्न व नोकरीची जबाबदारी घेतल्याचे विनायकराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...