आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हराळी येथील खरीप हंगामपूर्व मेळाव्यास प्रतिसाद ;  बियाणांची निवड, उगवण क्षमता याबाबत तज्ज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोहाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगामाच्या पेरणीचे दिवस तोंडावर आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी ज्ञानप्रबोधिनी हराळी, तालुका कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या केंद्रात सोमवारी (दि. ३० मे) खरीप हंगामपूर्व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी सोयाबीन लागवडीसाठी बियाणांची निवड,बियाणे उगवण क्षमता तपासणी, रुंद सरी वरंबा (बीबीएफ) पेरणी तंत्रज्ञानाचे महत्त्व, बीज प्रक्रिया व विविध शासकीय योजना याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी मार्गदर्शकांकडून आपल्या शंकांचे निरसन करून घेत या उपक्रमाचा योग्य पध्दतीने उपयोग करून घेतला. या कार्यक्रमास सास्तुरचे मंडळ कृषी अधिकारी तराळकर, ज्ञानप्रबोधिनीचे ज्येष्ठ सदस्य ज्ञानेश्वर सावंत, कृषी तंत्र विद्यालय हराळी येथील प्राचार्य प्रा. गौरी कापरे, कल्याण औटे, संतोष राठोड, संदीप सूर्यवंशी यांच्यासह तालुक्यातील तोरंबा, सय्यद हिप्परगा, तावशीगड, सालेगाव, जेवळी आदीसह २१ गावांतील पुरुष व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध प्रकारे मार्गदर्शन प्रा. कसबे यांनी सोयाबीन, तूर, मूग, बाजरी, ज्वारी आदी खरीप पिकांची विविध वाणे, रासायनिक व सेंद्रिय बीज प्रक्रिया, बियाणांची उगवण क्षमता तपासणे, तण नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. अश्रुबा जाधव यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व, जमिनीचे आरोग्य, शेतकऱ्यांचे आरोग्य व बांधावरील वृक्ष लागवड या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात सेंद्रिय निविष्ठा निर्मितीचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये जीवामृत, घन जीवामृत, अमिनो अॅसिड, वेस्ट डिम्पोजर, दशपर्णी अर्क आदी सेंद्रिय निविष्ठा प्रत्यक्ष बनवून दाखवण्यात आल्या. याबाबत संबंधित बाबीचे सविस्तर वर्णन शेतकऱ्यांना करून दाखविण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...