आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद:जिल्ह्यात सामाजिक न्याय पर्व निमित्त कार्यक्रमांना प्रतिसाद

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्‍ विभाग मार्फत दि. २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ हा कालावधी सामाजिक न्यायपर्व म्हणून करण्यात येत आहे. विभागाचे सचिव, आयुक्त आणि प्रादेशिक उपायुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार समतापर्व निमित्त विविध कार्यक्रमाचे, उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी श्रीपतराव भोसले हायस्कूल उस्मानाबाद येथे भारतीय संविधान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प्‍हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तसेच सर्व उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर यांनी सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. उपस्थित रा.प.महाविद्यालयाचे सहा.प्राध्यापक नितीन गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यालयातील कार्यालय अधीक्षक गवळी एस.ए., भोसले वाय.एस. आणि चव्हाण वाय.एस. तसेच महाविद्यालयातील दोनशे विद्यार्थी आणि शिक्षक मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन करुन भारतीय संविधान व्याख्यान मालेचा समारोप करण्यात आला.

दि. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प्‍हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले आणि सर्व उपस्थित विद्यार्थी, शिक्षक तसेच मान्यवर यांनी सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. उपस्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल बी.ए.नाईकनवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यालयातील भोसले वाय.एस. आणि चव्हाण वाय.एस तसेच महाविद्यालयातील दोनशे विद्यार्थी आणि शिक्षक मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन झाले.

युवकांसाठी कार्यशाळा
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण येथे अनसूचित जाती स्वयं सहाय्यता युवागटाची कार्यशाळा या विषयावर व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तसेच सर्व उपस्थित मान्यवर यांनी सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...