आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:ज्येष्ठांच्या जनकल्याण शिबिर व स्नेहमेळाव्यास प्रतिसाद

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रभाग चारमधील बाळासाहेब ठाकरेनगर येथे ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा व जनकल्याण शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसेनेचे उपशहरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत (बापू) साळुंके यांनी बुधवार, १४ डिसेंबर रोजी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते.

प्रभाग चारमधील नागरी समस्यांचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर त्यांनी जनकल्याण शिबिर आणि सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेह मेळाव्याचे बुधवारी आयोजन केले. सकाळी जनकल्याण शिबिर तर ज्येष्ठ नागरिक मेळावा सायंकाळी आयोजित करण्यात आले. जनकल्याण शिबिरामध्ये संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनेसाठी पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एकूण १०९ जणांची नोंदणी करण्यात आली.सायंकाळी झालेल्या स्नेहमेळाव्यात १४० ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...