आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहमेळावा:उस्मानाबादेत श्री सिद्धीविनायक परिवाराच्या स्नेहमेळाव्यास प्रतिसाद

उस्मानाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री सिध्दीविनायक परिवाराचा स्नेहमेळावा शहरातील परिमल मंगल कार्यालयात परिवाराचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

श्री सिध्दीविनायक परिवाराच्या स्थापनेपासून जोडल्या गेलेल्या सदस्यांसह कर्मचाऱ्यांचा सहपरिवार स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला हाेता. सदरील कार्यक्रमात दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी श्री सिध्दीविनायक परिवारातील सर्व उद्योगामधील कार्यरत आजी व माजी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला.

तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांच्या परिवारातील सदस्यांनीही श्री सिध्दीविनायक परिवाराबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. श्री सिध्दीविनायक परिवार २००२ सालापासून समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून कार्यरत असून, श्री सिध्दीविनायक मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.,श्री सिध्दीविनायक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.,उद्योग साधना फाउंडेशन, समृद्धी गारमेंट्स, श्री सिध्दीविनायक सोसायटी माती परीक्षण प्रयोगशाळा व शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारा श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक हा गुळ पावडर कारखाना, समृद्धी पेट्रोलियम, ॲग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या माध्यमातून श्री. सिध्दीविनायक परिवार जिल्ह्यातील सर्व ग्राहकांच्या व सभासदांच्या सेवेमध्ये कार्यरत असल्याचे दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले.

या वेळी कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामध्ये परिवाराच्या मागील वीस वर्षांच्या वाटचालीचा आलेख मांडला. सिध्दीविनायक परिवाराचे सदस्य अॅड. प्रतिक देवळे यांनी प्रास्ताविक केले तर आभार परिवाराचे सदस्य व जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. नितीन भोसले यांनी मानले. याप्रसंगी यशदा मल्टिस्टेटचे अध्यक्ष सुधीर सस्ते व चार्डर्ड अकाउंटंट प्रवीण प्रजापती उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...