आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा निकाल 96 टक्के, सूरज लबडे प्रथम

तुळजापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९६.९५ टक्के लागला. महाविद्यालयातून सूरज लबडे ८६ टक्के गुण घेऊन प्रथम आला. वाणिज्य शाखेतून सूरज धीरज लबडे ८६.३३ टक्के प्रथम, प्रतिभा राजेंद्र गरगडे ८१ टक्के गुणांसह द्वितीय तर गायत्री चव्हाण ७३ टक्के गुण घेऊन तृतीय आली. कला शाखेतून प्रथम क्रमांक जाधव सुप्रिया संभाजी ८३.६७ टक्के, द्वितीय पलंगे स्नेहल दशरथ ७३.८३ %, तृतीय क्रमांक पवार आरती शत्रुघ्न ७०.८३%. विज्ञान शाखेमधून प्रथम कावरे युवराज धर्मेंद्र ७२.१७%, द्वितीय क्रमांक साळुंके शाकंबरी सुनील ६६.००%, तृतीय क्रमांक कदम मोहिनी महेश ६४.६७%. किमान कौशल्य अभ्यासक्रमातून प्रथम क्रमांक पवार रविराज श्रीराम ६३.६७%, द्वितीय क्रमांक कोतवाल जुबेर ६०.१७%, तृतीय क्रमांक लबडे आकाश मोहन ५३.६७% या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचे बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण, कार्याध्यक्ष नरेंद्र बोरगावकर, सचिव उल्हासदादा बोरगावकर, उपाध्यक्ष अभयकुमार शहापूरकर, संचालक बाबूराव चव्हाण, प्राचार्य डॉ. अनिल शित्रे, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे यांनी अभिनंदन केले. शाखानिहाय महाविद्यालयाचा निकाल वाणिज्य शाखा ९४.५४%, विज्ञान शाखा १०० %, कला शाखा ९३.६१%, किमान कौशल्य शाखा १०० % असा असून महाविद्यालयाचा एकूण निकाल ९६.९५ % लागला आहे. विद्यालयातील विविध शाखांतून यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...