आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालष्करी जवान दयानंद दत्तू खबोले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. खबोले लष्करातील २२ वर्षांच्या सेवेनंतर काश्मीर येथून सेवानिवृत्त झाले आहेत. या वेळी खबोले यांच्या सहकारी लष्करी जवानांचाही सत्कार करण्यात आला.
तुळजापूर खुर्द येथील भावसार भक्त निवासात आयोजित सत्कार सोहळ्याचा अध्यक्षस्थानी तुळजाई पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक पंडितराव जगदाळे, जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण नन्नवरे, राजाभाऊ साळुंके, जगन्नाथ नरवडे उपस्थित होते. या वेळी खबोले यांच्यासोबत त्यांचे सहकारी संभाजी कदम भानसगाव (ता. उस्मानाबाद), शंकर जाधव कसेगाव (उळे) ता. दक्षिण सोलापूर, दत्ता नवगिरे तुळजापूर, गजानन ठाकरे राळेगाव (यवतमाळ), उमेश भुरुगे परंडा, मारुती यादव लातूर या लष्करी जवानांचा सत्कार करण्यात आला. जवानांनी देशसेवेदरम्यान आलेले रोमहर्षक अनुभव, कठीण प्रसंगाच्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन सचिन राऊत यांनी तर आभार दिपक खबोले यांनी मानले. कार्यक्रमास रामेश्वर उंबरे, संजय खुरूद, विकास मलबा, अॅड. बालाजी देशमाने, महालिंग राऊत, गुरुलिंग राऊत, गौरीशंकर देशमाने, ज्ञानेश्वर घोडके, सूरज देशमाने, बबलू राऊत यांच्यासह तुळजाई मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
२२ वर्षांची देशसेवा
दयानंद खबोले ३ फेब्रुवारी २००० रोजी सैन्यदलात भरती झाले होते. हजारीबाग (झारखंड) येथील प्रशिक्षणानंतर खबोले यांनी त्रिपुरा, प. बंगाल, राजस्थान, जम्मू काश्मीर व शेवटी काश्मीर येथे सेवा बजावली. तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ देशसेवेनंतर खबोले सेवानिवृत्त झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.