आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाज बांधव उपस्थित:सेवानिवृत्त शिक्षक शाहूराज चव्हाण यांचा सपत्निक सत्कार

उमरगा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जकेकूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सहशिक्षक शाहूराज चव्हाण यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सपत्नीक सत्कार करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुमनताई काळे अध्यक्ष स्थानी होत्या. यावेळी उपाध्यक्ष शारदा चौधरी, श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शहाजी पाटील, सरपंच अनिल बिराजदार,विठ्ठलसाई साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील, ह भ प शरद बिराजदार महाराज आदी उपस्थित होते.

प्रारंभी सेवानिवृत्त शिक्षक शाहूराज चव्हाण यांचा ग्रामस्थांच्यावतीने सपत्नीक पुष्पहार फेटा शाल देऊन परिवारासह सत्कार करण्यात आला. यावेळी दाळींब बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी आर एल कानडे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी बाळासाहेब महाबोले, बलसूर केंद्र प्रमुख नंदकुमार चौधरी, केंद्रिय मुख्याध्यापक पी डी सोमवंशी, दाळींब केंद्र प्रमुख पाशाभाई कोकळगावे, श्री कलाल, जिप शिक्षक मनोज घोडके, प्रविण स्वामी आदी उपस्थित होते. उमेश खोसे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. दरम्यान उपस्थित मान्यवर शिक्षण प्रेमी समाज बांधव व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...