आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:माकणी ग्रामपंचायतीकडून सेवानिवृत्तांचा सत्कार

लोहारा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा तालुक्यातील माकणी येथे शनिवारी (दि.३०) ग्रामपंचायतीच्या वतीने सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील माकणी येथील भारत माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक शाहुराज जाधव हे शासन नियमानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सत्कार माकणीचे सरपंच विठ्ठल साठे यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच भारतीय सैन्यदलात २१ वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले वैजिनाथ काजळे यांचाही ग्रामपंचायत सदस्य सरदार मुजावर यांच्या हस्ते करण्यात आला. सरस्वती माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक कांत चेंडकाळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच वामन भोरे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, ग्रा.प.सदस्य गोवर्धन आलमले, बाळू कांबळे, अच्युत चिकंद्रे, अभिमन्यू कुसळकर, अॅड. दादासाहेब जानकर, ग्रामविकास अधिकारी शिवानंद बिराजदार, ग्रा.प. कर्मचारी रणजित साठे, मनोज राजपुत, महादेव सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...