आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:‘तुळजाभवानी अभियांत्रिकी’त जाधव बंधूंचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील दत्तात्रय रंगनाथ जाधव व नागनाथ गणपत जाधव यांचा सेवा निवृत्ती निमित्त सत्कार करून निरोप देण्यात आला. दत्तात्रय जाधव ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवे नंतर सेवा निवृत्त झाले आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी.पेरगाड व सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. विवेक गंगणे यांचा हस्ते तुळजाभवानी देवी ची प्रतिमा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तात्रय जाधव ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतील अनुभव कथन केले. प्राचार्य पेरगाड यांनी दोघांच्या कामाची प्रशंसा करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्रबंधक रवी दुरुगकर यांनी तर आभार महादेव लबडे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...