आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:आयुर्वेदिक महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया पूर्ववत करा ; दुधगावकर यांचा आंदोलनाचा इशारा

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रियेत २५ प्रवेश नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे बुधवारी(दि.२) निवेदनाद्वारे केली आहे.अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

श्री. दुधगावकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, एका बाजुला जिल्ह्यात यंदापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे, तर वर्षानुवर्ष सुरु असलेल्या उस्मानाबाद शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात एनसीआयएसएमने काही त्रुटी काढून यंदापासुन ४८ पदव्युत्तर प्रवेश क्षमता असताना ती आता केवळ २३ वर आणली आहे. यामुळे तब्बल २५ प्रवेश याठिकाणी नाकारले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यावर हा मोठा अन्याय आहे. ही प्रवेश क्षमता पुर्ववत ठेवण्यात यावी, कोरोना काळात आयुर्वेदिक महाविद्यालयाने चांगले काम केले.

बातम्या आणखी आहेत...