आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा बैठक:पीक परिस्थितीचा आढावा घेत पंचनामे करा;आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या सूचना

उमरगा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा-लोहारा तालुक्यात पर्जन्यमान, पीक परिस्थिती, कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात शनिवारी (दि. ३०) आमदार ज्ञानराज चौगुले यांनी तहसील कार्यालयात सर्व प्रमुख विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र आढावा बैठक घेत सूचना दिल्या.

आमदार चौगुले यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे निर्देश दिले. पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी संबंधीत विभागाने दक्षता घ्यावी. पर्जन्यमानाची माहिती, विविध पाझर, साठवण तलावांची सद्यस्थिती, गोगलगाय व विविध रोगांमुळे पिकांच्या नुकसानीचा तक्रारींचा तपशील, पीकविमा, अतिवृष्टीने झालेल्या जीवित व वित्तहानीचा मोबदला, पीककर्ज, शेतपाणंद रस्ते योजना, मग्रारोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना, वृक्षलागवडीचे उद्दिष्ट, कोरोनात मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना अर्थसहाय, जलजीवन मिशनची सद्यस्थिती, कायदा व सुव्यवस्था, आरोग्यविषयक समस्यांचा विभागनिहाय स्वतंत्र आढावा घेतला.

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेतून मंजूर असलेली शेतरस्त्यांची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना संबंधित विभागास केल्या. या बैठकीस उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार राहुल पाटील, लोहारा तहसीलदार संतोष रूईकर, तालुका कृषी अधिकारी एस. एन. बारवकर, लोहारा तालुका कृषी अधिकारी एम. बी. बीडबाग, गटविकास अधिकारी लोहारा एस. आर. खिंडे, उपअभियंता जि.प. बांधकाम व्ही. जी. चिडगोपकर, पोलिस निरीक्षक मनोज राठोड, सपोनि एस. पी. काकडे, सहायक पोलिस निरीक्षक आर. एम. जगताप, उपकार्यकारी अभियंता महावितरण आर. एम. शेंडेकर, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, जिल्हा समन्वयक विमा कंपनीचे ए. एन. मुळे, सहायक गटविकास अधिकारी लोहारा डी. एल. मुळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. टी. शिपे, उपअभियंता स्थानिकस्तर आर. के. फुगटे, पंस सहायक गटविकास अधिकारी देवानंद वाघ यासह उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...