आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा:रा.गे. शिंदे महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांचा गौरव

परंडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रा. गे. शिंदे महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवीदिना निमित्त विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा प्रसंगी केले. गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.

प्राचार्य डॉ. सुनील जाधव पुढे म्हणाले की, भारत स्वतंत्र करण्यासाठी ज्या महापुरुषांनी आपले बलिदान दिले. त्यांच्या योगदानामुळे आज आपण स्वतंत्रपणे जीवन जगत आहोत. तेव्हा आपण त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून देशा प्रती आदर बाळगावा व महापुरुषांचे विचार आत्मसात करावे.यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी प्रा.डॉ. शहाजी चंदनशिवे, प्रा.डॉ महेशकुमार माने, प्रा.दत्तात्रेय मांगले, प्रा.संभाजी धनवे, भाऊसाहेब दिवाने आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...