आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्काराने सन्मानित:रा.गे. महाविद्यालयात स्नेहल  कोकाटे हिचा गौरव

परंडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रा.गे.शिंदे महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल सुधाकर कोकाटे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये वनस्पतिशास्त्र विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

येथील रा.गे. शिंदे महाविद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी स्नेहल कोकाटे हिने वनस्पतिशास्त्र या विषयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सर्वांत जास्त गुण मिळवून सुवर्णपदक मिळवले व सोबतच डॉ. शामराव त्रिंबकराव टिळक पुरस्कार व स्व.यमुनाबाई बळवंतराव देशपांडे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या २०२१ च्या पदव्युत्तर परीक्षेमध्ये स्नेहल कोकाटे हिने संपादन केले आहे. स्नेहल कोकाटे पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच हाड जोडीवर राष्ट्रीय स्तरावर वेब ऑफ सायन्स आणि यूजीसी लिस्टमध्ये संशोधन पेपर ही प्रकाशित केला होता.यावेळी प्रा.डॉ प्रकाश सरवदे, प्रा.डॉ.सचिन चव्हाण, आय प्रा.डॉ.महेशकुमार माने, प्रा.डॉ शहाजी चंदनशिवे, ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख, सुधाकर कोकाटे आदी उपस्थित होते .यावेळी वरिष्ठ विज्ञान विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...