आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठिंबा:रिपाइंचा मराठा आरक्षण महामोर्चाला पाठिंबा

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (रिपाइं आठवले गट) सकल मराठा समाजाच्या आरक्षण महामोर्चास पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षणासह इतर मागण्यांसाठी ८ नोव्हेंबरला परंडा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. महामोर्चास परंडा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने ५ नोव्हेंबर रोजी पक्षाचे प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे यांनी सकल मराठा समन्वय समितीकडे लेखी पत्र देऊन पाठिंबा दिला आहे.

यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष फकिरा सुरवसे, उपाध्यक्ष जयराम साळवे, आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, संपर्क प्रमुख दादा सुरवसे, संजीवन भोसले, उत्तम ओव्हाळ, हरीभाऊ अडगळे, बाबा शिदे, फुलचंद ओव्हाळ, विलास भोसले, दीपक ठोसर, सचिन राऊत, बाबा गायकवाड, हनुमंत प्रतापे, धनंजय सागर, रंदिल गायकवाड, रामचंद्र दाभाडे, मराठा आरक्षण समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...