आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात आरओ प्लांटच्या कामाचा शुभारंभ होऊन ३ महिने झाले तरी प्लांट सुरू झाला नाही. त्यामुळे येथील नागरिकांवर शुद्ध पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली.
उन्हाळ्यात हा आरओ प्लांटे सुरू होणे गरजेचे होते. परंतु उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला तरी आरओ प्लांट चालु झाला नाही. शहरात ठिकठिकाणी आरओ प्लांटसाठी उभारलेले शेड आरओ प्लांटच्या प्रतीक्षेत आहेत.
पाच महिन्यांपूर्वी आमदार राणजगजितसिंह पाटील यांनी शहरवासीयांना शुद्ध व थंड पाणी मिळावे, यासाठी शहरातील विविध भागात आपल्या निधीतून आरओ प्लांट लवकरच सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नळदुर्ग येथील १७ ठिकाणी आरओ प्लांटच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार होता. पहिल्या टप्प्यात इंदिरानगर, माऊली चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, हजरत सय्यद सादिक शहावली चौक, काझी गल्ली, रहीम नगर, भीम नगर, ब्राह्मण गल्ली, वसंत इनामदार गल्ली अशा एकूण दहा ठिकाणी मार्च महिन्यात आरओ प्लांटच्या कामाला शुभारंभ करण्यात आला होता. मात्र तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा आरओ प्लांट चालू न झाल्यामुळे शुद्ध व थंड पिण्याचे पाणी मिळेल, या आशेवर बसलेल्या नळदुर्गकरांच्या पदरी निराशा आली आहे. बोरी धरणात मुबलक पाणीसाठा असतानासुद्धा नळदुर्गकरांना नगरपालिकेच्या वतीने नळाच्या माध्यमातून आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्गकरांसाठी आरओ प्लांटच्या माध्यमातून शुद्ध पाणी देण्याची घोषणा केल्यानंतर नळदुर्गकरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र प्लांट अद्याप सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.