आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:ओढा बुजवून रस्ता; गटविकास अधिकाऱ्यांना न्यायालयाची नोटीस

कळंब13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील डिकसळ येथील गट क्र. ७२ (अ) मध्ये नैसर्गिक ओढा बुजवून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद योजनेंतर्गत रस्ता बनवण्यात येत आहे. यासंदर्भात कळंब न्यायालयाने गटविकास अधिकाऱ्यांसह अन्य दोघांना नोटीस बजावली आहे. डिकसळ येथील गट क्र. ७२ (अ) मध्ये अनेक वर्षांपासून नैसर्गिक ओढा आहे. अधिक पाऊस झाल्यावर शेतातील पाणी त्या ओढ्यातून वाहून जाते.

येथेच मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद योजनेंतर्गत राणोबा मंदिर ते पिंपळगाव रस्ता नावाने एक किलोमीटरचा रस्ता बनवण्यात येत आहे. नैसर्गिक ओढा बुजवल्यावर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे, त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी विरोध करुन काम बंद पाडले आहे. नैसर्गिक ओढा बुजवून शेत-पाणंद योजनेंतर्गत रस्ता करण्यात येत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी ५ मे व ३० मे २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदारांकडे दाखल करण्यात आली होती. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. नैसर्गिक ओढा बुजवून रस्ता करण्यात येत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली असतानाही शेतकऱ्यांची दखल न घेता काम करणाऱ्या गुत्तेदारास पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...