आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळंब तालुक्यातील खामसवाडी येथील महावितरण उपकेंद्रातील रोहित्र दि ४ जून रोजी जळाला होता. रोहित्र अद्याप दुरुस्त न केले नाही किंवा नवीन बसवले नाही. त्यामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांची उभी पिके वाळत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांना भटकावे लागत आहे.
शेजारच्या मोहा गावातून शेतातील पिण्याच्या पाण्यासाठी दररोज एक तास लाइट दिली जाते. परंतु कमी दाबाने पुरवठा असल्याने विद्युत पंप चालु होत नाहीत. त्यामुळे शेतातील ऊसाचे पीक डोळ्यासमोर वाळत आहे. चांगला दर मिळत असल्याने खामसवाडी परिसरात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. परंतु विजेअभावी पाणी मिळत नसल्याने ते पीक वाळत आहे.
८ दिवसांपासून वीज नाही
गेल्या वर्षी ऊसाचे चांगले उत्पन्न झाल्याने ऊस खोडवा पीक ठेवले आहे. चार दिवसांपासून पाऊस नाही. तसेच विद्युत उपकेंद्रात रोहित्र जळून आज ८ दिवस झाले. परंतु ऊस पीक पाण्याविना वाळत आहे. -बाबासाहेब माने, शेतकरी, खामसवाडी.
मिरची पिकास फटका
यावर्षी मिरची लागवड केली आहे. परंतु उपकेंद्रातील रोहित्र जळाल्याने मिरचीची फुले गळत आहेत. त्यामुळे मिरची उत्पादनात घट आली, पिकाचा खर्च निघणेही कठिण झाले आहे. -बजरंग माळी, शेतकरी, खामसवाडी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.