आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मशिनरी फिटिंग चे काम:तुळजाभवानी कारखान्यात रोलर पूजन

नळदुर्ग3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम २५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कारखान्यात मशिनरी फिटिंग चे काम पूर्ण झाले असून येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात बॉयलर प्रदीपन कार्यक्रम होणार आहे.अनेक वर्षे बंद असलेला श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना गोकुळ शुगर च्या सहकार्याने सुरू झाला. कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण यांनी गतवर्षी चाचणी हंगाम यशस्वी रित्या पूर्ण केला व या वर्षी पूर्ण क्षमतेने हा कारखाना चालू होणार असून त्या साठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

चालू गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज झाला असून यासाठीच मशिनरी रोलर पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी बाबुराव चव्हाण, रणवीर चव्हाण, कार्यकारी संचालक विकास भोसले, संगप्पा हगलगुंडे, चीफ इंजिनियर शत्रुघ्न जाधव, चीफ केमिस्ट गोविंद पाखले, रामचंद्र भोसले, तानाजी पाटील, अशोक मोहरीर, अजिंक्य चव्हाण, प्रवीण गोटे, सचिन भोसले, बालाजी मुळमे, राहुल जाधव, विवेक व्हटकर, शिवाजी चव्हाण, पिंटू लोहार, तुकाराम सजन, श्याम साळुंखे,, जुबेर पटेल, निलय्या स्वामी, निलेश पाटील, राजेंद्र गुडडे, अभिषेक भुतेकर, साबळे उपस्थित होते.

पूर्ण क्षमतेने चालणार
कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस आहे त्यामुळे यंदाच्या गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने होणार आहे. गळीत हंगामासाठी मिशनरी फिट करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक उसाचा प्रश्न मिटणार आहे.
सुनील चव्हाण,चेअरमन, तुळजाभवानी कारखाना

बातम्या आणखी आहेत...