आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध विषयावर तज्ञाकडून मार्गदर्शन:सुंदर मी होणार विषयावर रोटरी क्लबची कार्यशाळा

उस्मानाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात रोटरी क्लब व ओस्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुंदर मी होणा” या विषयावर महिला सक्षमीकरण विभागाअंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा झाली. सदर कार्यशाळेमध्ये विद्यार्थिनींनी आरोग्याची घ्यावयाची काळजी, आहार, आवश्यक ते व्यायाम, प्राणायाम, योगासने, त्याचबरोबर आत्मविश्वास वाढविण्यासाठी हलकाफुलका मेकअप व हेअर स्टाईल अशा विविध विषयावर तज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून आयुर्वेद तज्ञ डॉ. कोथळकर, स्त्रीरोग तज्ञ डॉ सस्ते, राणी भोईटे, फिटनेस ट्रेनर ब्युटीशियन दमयंती साळवी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शांतिनाथ घोडके तर रोटरी क्लबच्या सचिव डॉ.अनार साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक महिला सक्षमीकरणाच्या प्रमुख डॉ.स्वाती जाधव यांनी केले तर आभार प्रा. स्वाती बैनवाड यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा.सौ गोंदकर ,प्रा.सौ सरवदे, प्रा.शलाका वाघ ,प्रा.डॉ. माधुरी सोनटक्के,प्रा.सबा शेख, प्रा.सुप्रिया शेटे, प्रा.बाबर प्रा. डॉ.महाडिक, प्रा. स्वाती आकोसकर, प्रा. शिल्पा डोळे,प्रा. गावित प्रा.सौ शिंदे ,श्रीमती गायकवाड, श्रीमती वाघमारे ,श्रीमती शेलार, कु.वाकुरे आदींनी पुढाकार घेतला. कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...