आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:अधिक भाडे आकारणाऱ्या 18 ट्रॅव्हल्सवर आरटीओची कारवाई

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीत जादा भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाच्या वतीने ९ ते ३० ऑक्टोबर दरम्यान कारवाई करण्यात आली. यात १८ जण सापडले असून त्यांच्याकडून दंडात्मक टॅक्स वसुली केल्याचे सहायक उपप्रादेशीक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी सांगितले.

प्रवाशांची लूट करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार आरटीओने या काळात ३४६ खासगी वाहन, ट्रॅव्हल्सची तपासणी केली. यात १८ ट्रॅव्हल्सने अधिक भाडे आकारल्याचे सापडले. इतर ६९ खासगी वाहनांवर कारवाई केली. त्यांना ३७ हजाराचा दंड दिला. तसेच दोन लाख ५७ हजाराचा करही वसूल केला. तब्बल नऊ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...