आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात २०१९ साली उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ६ महिन्यांमध्ये कोरोनाचे संकट आले व हे संकट दीड वर्ष राहिले. या काळात उध्दव ठाकरे यांनी काटेकोर उपाययोजना करुन अनेक नागरिकांचे प्राण वाचविले. अनेक अडथळ्यांवर मात करुन महाविकास आघाडी सरकारने राज्यात व जिल्ह्यात अनेक लोकोउपयोगी कामे केली . तेव्हा राज्यकर्त्यांनी विकासाची स्पर्धा ठेवावी असे प्रतिपादन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शहरातील विविध विकास कामांच्या भुमीपुजन प्रसंगी केले. ते पुढे म्हणाले की, प्रामुख्याने जिल्ह्यासाठी आवश्यक असणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठीची प्राधान्यक्रम अट रद्द केली व शहरासाठी महत्वपुर्ण असलेली भुयारी गटारी मार्ग (२०८.७५ कोटी) तसेच ५० वर्षानंतर वाढती लोकसंख्या ग्रहित धरुन उजनी धरणातील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वाढविले व जिल्ह्यात व शहरात रस्ते विकासासाठी कोट्यावधींचा निधी दिला.
मात्र महाविकास आघाडीचे सरकार भाजपाने कारस्थान करुन खाली खेचले व या सरकारने सत्तेत आल्यानंतर अनेक विकास कामांना स्थगिती दिली. महावितरणचे ट्रान्सफार्मर बसविण्याची कामे थांबविली गेली यामुळे शेतकऱ्यांना ऐन रब्बी हंगामात सुरळीत विद्युत पुरवठा करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांना केवळ ८ तास वीज मिळत आहे.
भाजपा जिल्ह्यातील आमदारांनी पीकविमा प्रश्नावर ५३१ कोटी ऐवजी २०१ कोटी रुपये विमा कंपनीस नुकसान भरपाई शपथपत्राद्वारे का मागितली, याचे उत्तर त्यांनी अनेकदा आव्हान करुन का दिले नाही हे आधी सांगावे व नंतरच पीकविम्याबाबत ब्र शब्द काढावा. राज्यकर्त्यांनी त्यांचे सरकार आले म्हणुन विरोधी व द्वेष भावनेतून वागणे हे सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे त्यांनी विरोधाला विरोध म्हणून सर्वसामान्य जनतेस वेठीस धरु नये असे आवाहन त्यांनी केले.राजकारण म्हणजे आपल्या जनतेवर सुड उगविणे नव्हे असा टोला उद्घाटन प्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लावला.
याप्रसंगी पजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, पप्पु मुंढे शहर अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य दिपक जवळगे, सिद्धेश्वर कोळी सर, सोमनाथ गुरव, रवी वाघमारे युवा सेनेचे शहर अध्यक्ष, रोहित निंबाळकर, बाळासाहेब काकडे, तुषार निंबाळकर, राजाभाऊ पवार, महेबूब भाई पटेल, गणेश बप्पा खोचरे, यांच्यासह नागरिक, पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारकडून अन्याय
रस्त्यांची अनेक कामे स्थगित केली. या शासनाच्या निर्णयाने राज्यात व शहरात अनेक विकास कामे खोळंबून राहिली आहेत. उस्मानाबादेत दुरावस्था झालेली उद्याने (जिजामाता उद्यान व संभाजी उद्यान) यांना मंजूर झालेला कोट्यावधीचा निधी तसेच आठवडी बाजाराचा विकास ही कामे ह्या सरकारने स्थगित करुन अन्याय केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.