आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावा:अनुदानातून जिल्हा वगळल्याची अफवा

उस्मानाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप २०२२ मध्ये सातत्याच्या पावसामुळे झालेल्या नुकसानी पोटी अधिकचे २२० कोटी पुढील आठवड्यात असलेल्या मंत्रिमंडळ उप-समितीच्या बैठकीत मंजुरीनंतर मिळणार आहेत. जिल्ह्याला अनुदानातून वगळले असल्याची निव्वळ अफवा आहे, असा दावा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे.उस्मानाबाद जिल्ह्याला यापूर्वी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी ९० कोटी तर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी १५४ कोटी रुपये अनुदानप्राप्त व वितरीत झाले आहे. तसेच अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी अधिकचे ५९ कोटी रुपयांचे अनुदान देखील मंजुर असून ते देखील लवकरच वितरीत करण्यात येणार आहे.

तसेच सततच्या पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी अधिकच्या २२० कोटी अनुदानाची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. संपूर्ण राज्याची या करिता १८०० कोटींची मागणी आहे.शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना एनडीआरएफ / एसडीआरएफ निकषांच्या पुढे जाऊन तीन हेक्टरपर्यंत प्रती हेक्टरी १३ हजार ६०० प्रमाणे अनुदान दिले आहे.

सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी तर पहिल्यांदाच शेतकऱ्यांना या प्रकारे भरीव मदत दिली जात आहे. यापूर्वी कोणत्याही सरकारने अशी मदत केली नव्हती. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी अनुदान देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली असून पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत यास मान्यता मिळणे अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...