आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील सार्वजनिक वाचनालये तुटपुंज्या अनुदानावर चालवताना दमछाक होत आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी ‘ गाव तिथे वाचनालय ’ ही संकल्पना मांडली. तेंव्हापासून शहरासह ग्रामीण भागात खाजगी संस्थांनी सार्वजनिक वाचनालये सुरु केली. तालुक्यात एकूण ५५ सार्वजनिक वाचनालये असून यामध्ये //"अ//" दर्जाचे एकमेव शहरातील नगरपालिकेचे रविंन्द्रनाथ टागाेर वाचनालय आहे, //"ब//" दर्जाची ७ आहेत, //"क//" दर्जाची १५ व //"ड//" दर्जाची ३२ वाचनालय आहेत. सार्वजनिक वाचनालयाला सन २०१२ पासून नविन मान्यता आणि दर्जा ( वर्ग )वाढच दिली गेली नाही. तब्बल २०१२ पासून म्हणजेच दहा वर्षापासून दर्जावाढ व अनुदान वाढ मिळाली नाही.
या भूमिकेमुळे सार्वजनिक वाचनालयाच्या चळवळीची उपेक्षा झाली असून आता वाचनालये चालवायची कशी, असा प्रश्न सार्वजनिक वाचनालय चालविणाऱ्या खाजगी संस्थांना निर्माण झाला आहे. तालुक्यातील सार्वजनिक वाचनालयात वर्तमानपत्रे,पुस्तके , मासिके, ग्रंथपालाचे मानधन, जागेचे भाडे, विज बिल,फर्निचर आदींचा खर्च वाचनालय चालवणाऱ्या संस्थांना करावा लागत आहे.
सध्या नव्याने सभासदही होण्यास नागरिक पुढे होत नसल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे लोकवर्गणी पुरेशा प्रमाणात जमा होत नाही. शासन दर्जानुसार वर्षाला दोन टप्यात वाचनालयाला अनुदान देते. यामध्ये ''अ '' दर्जाच्या वाचनायला दाेन लाख ८८ हजार रूपये वार्षिक अनुदान, '' ब '' दर्जाच्या वाचनायला दोन लाख २८ हजार रुपये वार्षिक अनुदान, '' क '' दर्जाच्या वाचनायला ९६ हजार रूपये वार्षिक अनुदान व '' ड '' दर्जाच्या वाचनायला तीस हजार रूपये वार्षिक तुटपुंजे अनुदान मिळते.
यातूनच वार्षिक खर्च करताना तारेवरची कसरत करून कधीकधी संस्थेला स्वत: खर्च करावा लागताे. ज्या गावात कधी वर्तमानपत्र येत नव्हते अशा गावात संस्थांनी वाचनालये सुरु करुन वाचकांची बौद्धिक भूक भागवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बौद्धिक विकासाबरोबर समाजजीवन समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी हातभार लागत आहे. तर ग्रामीण भागात स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांचाही या वाचनायलयाकडे कल वाढला परंतु अनुदान मिळत नसल्याने नवीन पुस्तके घेण्यासाठी वाचनालयांसमोर अडचणी निर्माण होत आहेत.
नवीन वाचनालयाला सरकार प्रथम ‘ड’ वर्गात मान्यता देते त्यानंतर प्रत्येक वर्षी दर्जावाढ देत ‘ड’ वर्गातून ‘क’ तून ‘ब’ त्यानंतर ‘अ’ अशा प्रकारात सार्वजनिक वाचनालयाच्या अहवालावरुन दर्जावाढ दिला जातो. परंतु दर्जा वाढच नसल्याने तालुक्यात " ड " दर्जाचे वाचनालय तुटपुंजे अनुदानामुळे सार्वजनिक वाचनालय चालविणे मुश्कील असल्याने काही सार्वजनिक वाचनालये संस्था स्वतः बंद करत असल्याचे कळविले आहे.
तब्बल दहा वर्षापासून नवीन सार्वजनिक वाचनालयाला मान्यता दिली जात नाही.ग्रंथपालांवर उपासमारीची वेळ आली असून नवीन शासनाकडून या चळवळीला पोषक अशी मदत होईल अशी अपेक्षा सार्वजनिक वाचनालय चालविणाऱ्या संस्था चालकांना आहे. वाचन संस्कृती ही फक्त एखादया शहरापुरती विकसित होवून चालणार नाही त्यासाठी सार्वजनिक वाचनालयाच्या चळवळीला प्रोत्साहन देणे जरुरीचे आहे. अनुदान वाढ, विविध सुविधा देणे गरजेचे आहे.
उपेक्षा थांबवा,तरच वाचनालयांचा विकास शक्य
तुटपुंजे अनुदान असूनही तालुक्यातील सार्वजनिक वाचनालये चालवली जात आहेत. शासनाने दर्जावाढ करूनग्रंथालय कर्मचाऱ्यांची व संस्थेची उपेक्षा थांबवावी. - उमेश गोरे, वाचनालय, शेकापूर
ग्रंथालय अधिकाऱ्यांच्या भेटी असल्याने चांगली स्थिती
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी हे तालुक्यातील वाचनालयाला सतत भेटी देऊन वेळोवेळी मार्गदर्शन करून शासनाकडे वाचनालयाचे प्रश्न मांडत असल्याने ग्रंथालये चांगल्या स्थितीत सुरु आहेत.- दत्तात्रय काळे, प्रगती वाचनालय, उळूप
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.