आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:तुळजापुरात ग्रामीण‎ बिटस्तरीय शिक्षण परिषद‎

तुळजापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिर्थ(खु) व आपसिंगा या दोन्ही‎ केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद नरेंद्र‎ आर्य विद्यालय आपसिंगा येथे‎ घेण्यात आली.या शिक्षण परिषदेचे‎ प्रास्ताविक शिक्षण विस्ताराधिकारी‎ दैवशाला शिंदे यांनी केले. जिल्हा‎ शिक्षण प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद‎ यांनी नियोजित दिलेल्या‎ तासिकेनुसार अंबादास मैंदर्गी,‎ नितीन ढगे, २१ व्या शतकातील‎ जीवनमुल्ये या विषयावर दिप्ती‎ खडकीकर, अध्ययन निष्पत्ती‎ आधारित गणित पाठ या विषयावर‎ स्वाती खुणे, हक्क व बाल संरक्षण‎ या विषयावर अशोक चव्हाण,‎ दिव्यांग विद्यार्थी व त्यांना उपलब्ध‎ असलेल्या सेवा सुविधा या‎ विषयावर पुष्पा नाईकोडे यांनी‎ सविस्तर मार्गदर्शन केले.‎

परिषदेस जिल्हा परिषद शिक्षण‎ विभागातून विस्तार अधिकारी जंगम‎ तसेच देवगुडे यांनी भेट देऊन‎ मार्गदर्शन केले. परिषदेच्या‎ यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख ऋषी‎ भोसले व केंद्रप्रमुख तानाजी‎ महाजन यांनी श्रेय घेतले. शेवटी‎ शिक्षण विस्ताराधिकारी दैवशाला‎ शिंदे यांनी प्रशासकीय सूचना देऊन‎ सर्वांचे आभार मानले व परिषदेची‎ सांगता केली.‎

बातम्या आणखी आहेत...