आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. सरपंच पदासाठी स्वाती विशाल जमाले या ४२ मताने विजयी झाल्या असून दोन बिनविरोध उमेदवारासह अकरा उमेदवार विजयी झाले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एसपी शुगरचे संस्थापक चेअरमन सुरेश पाटील यांचे ग्रामविकास पॅनल व उद्योजक देवदत्त मोरे यांच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनल मध्ये चुरशीची लढत झाली.
यात परिवर्तन पॅनलच्या तारामती होगले व चंद्रकला जमाले या उमेदवार बिनविरोध निवडून आलेल्या होत्या. त्यामुळे सरपंच आणि पंधरा सदस्यासाठी दोन्ही पॅनल मध्ये एकास एक लढत झाली .विशाल जमाले यांच्या पत्नी स्वाती जमाले व एस पी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांच्या पत्नी सरिता पाटील यांच्यात थेट लढत होऊन स्वाती जमाले यांचा ४२ मताने विजय झाला.
प्रभाग क्रमांक एक मधून हारुन शेख ,धनाजी भालेराव, हिराबाई पवार प्रभाग क्रमांक दोन मधून प्रताप करंजकर व महानंदा कोळी प्रभाग क्रमांक तीन मधून सुलोचना करंजकर, शिवकन्या कोरे व संगीता पाटील आणि प्रभाग क्रमांक सहा मधून सुभाष धनके यांचा विजय झाला आहे. तर प्रभाग क्रमांक चार मधून चेअरमन पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलचे सचिन गाढवे ,बालिका डोलारे ,हिराबाई गावखरे प्रभाग क्रमांक सहा मधून अमर तांबोळी व पूजा कानगे आणि प्रभाग क्रमांक पाच मधून स्वतः चेअरमन सुरेश पाटील हे विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक पाच मध्ये परिवर्तन पॅनलचे प्रमुख शहाजी वाघ व चेअरमन पाटील यांच्या जोरदार टक्कर होऊन वाघ यांना पराभव पत्करावा लागला त्यामुळे परिवर्तन पॅनलची स्थिती गड आला पण सिंह गेला अशीच म्हणावी लागेल.परिवर्तन पॅनलला विजय मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कोंडाप्पा कोरे, माजी उपसरपंच शहाजी वाघ, विजयसिंह जमाले, तुळशीदास जमाले, चंद्रप्रकाश जमाले, डॉ. धनंजय करंजकर व विशाल जमाले यांची साथ मिळाली आहे. परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांनी मंगळवारी दुपारी संपूर्ण गावातून रॅली काढली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.