आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:थंडीच्या कडाक्यामुळे कानटोपी, स्वेटर खरेदीसाठी गर्दी ; उबदार कपड्यांचे दर वाढले

उस्मानाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीपासून थंडीची तीव्रता वाढल्याने उबदार कपड्यांची खरेदी वाढली. यंदा कानटोपी, मफलर, स्वेटरच्या किंमती दुपटीने वाढल्या असून गतवर्षी ३० रुपयांना मिळणारी कानटोपी ६० रुपयांना मिळत आहे. मोठ्यांपेक्षा लहान मुलांचे कपडे महाग झाले आहेत.

शहरात दाखल उबदार कपड्यांच्या स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. सध्या तापमान १८ ते २१ अंश सेल्सिअसपर्यंत असून रात्री थंडी अधिक असते. शहरातील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर व्यायामासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. थंडीत लहान मुलांची काळजी घेण्याची गरज आहे. सध्या लहान मुलांना हात व पायाला पुरळ येत असून दहा बालकांत एक रुग्ण आढळत आहे. ग्रामीण भागातही थंडीचे प्रमाण वाढले आहे. सकाळी रब्बी पीक व गवतावर मोठ्या प्रमाणात दव पडत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात शेकोट्या पेटवल्या जातात. तसेच शहरातील काही चौकातही रिक्षा चालक शेकोटी पेटवतात. यंदा ऑक्टोबरपर्यंत पाऊस झाल्याने सर्व प्रकल्प भरलेले असून अनेक ठिकाणी पाणीसाठा आहे. यामुळे गारठा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे वयोवृद्धांसह लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मागील दोन दिवसांपासून हवेचा वेग वाढत असल्याने थंडीची तीव्रताही अधिक जाणवणार आहे.

३० ते ४० टक्क्यांची दरवाढ शहरातील जनता बँकेसमोर व नगरपालिकेसमोर उबदार कपडे विक्रेत्यांनी स्टॉल मांडले आहेत. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के दर वाढले आहेत. महागाईमध्ये नागरिक होरपळून निघत आहेत. मात्र, थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपड्यांची खरेदी करावी लागणार आहे.

कच्च्या मालाचे दर वधारले, वाहतूक भाड्यामध्येही वाढ कच्च्या मालाचे दर वाढले असून पेट्रोल, डिझेल वाढल्याने वाहतुकीचे भाडेही वाढले आहेत. यामुळे कान टोपी, स्वेटर यासह इतर गरम कपड्याचे दर वाढले आहेत. मात्र, इतर दुकानांपेक्षा स्टॉलवरील कपडे स्वस्त आहेत. खर्च वाढल्याने दर वाढले आहेत. -एस. के. शेख, स्वेटर विक्रेता.

बातम्या आणखी आहेत...