आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील शासकीय कार्यालयांचे काम अधिक पारदर्शकपणे व्हावे तसेच नागरिकांची कामे वेळेत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून समाधान मोबाइल ॲपची लवकरच उस्मानाबादकरांना भेट मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली. यासाठीअधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, अधिकारी उपस्थित होते. सर्व तालुक्यांमधील कार्यालयांच्या प्रमुखांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे या बैठकीत सहभाग घेतला. जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे म्हणाले, समाधान ॲपव्दारे नागरिकांनी सादर केलेल्या तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हास्तरीय प्रशक्षिण घेण्यात आले. त्यामुळे या ॲपबाबत सर्वांनी साक्षर होऊन नागरिकांना वेळेत सेवा देण्याचे प्रयत्न करावेत, लवकरच हे प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी यावेळी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.