आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉल्बींचा दणदणाट, स्फूरण चढवणारे पोवाडा, हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्याची महती सांगणारी गीते, आकर्षक प्रकाश योजना, शिस्तीत शांतता, संयम ठेवत गितांवर थिरकणारी तरुणाई, अशा जल्लोषमय वातावरणात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबादेतून मिरवणूक काढण्यात आली. दिवसभर संघटना, नेत्यांकडून चौकाचौकात छत्रपती शंभूराजेंना अभिवादन करण्यात आले. उत्साहामुळे शहर भगवेमय झाले होते.
शहरात विविध १९ ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेसह पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती. निंबाळकर गल्ली, गणेशनगर, पापनाशनगर, साळुंकेनगर, नेहरू चौक, समतानगर चौक, जिजाऊ चौक, मध्यवर्ती प्रशाकीय इमारत आदी ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री बहुतांश ठिकाणी विविध मंडळांकडून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या.
अनेक ठिकाणी शक्तिशाली, तब्बल २५ पेक्षाही अधिक साऊंड असलेल्या डॉल्बी सिस्टिम लावण्यात आल्या होत्या. निंबाळकर गल्ली, बार्शी नाका, समता चौकातील डॉल्बीचा दणदणाट सर्वत्र घुमत होता. रथाला विविध रंगाच्या लाइट्स लावण्यात आल्या होत्या. डिजेंकडून डॉल्बिवरील गीतांचे नियंत्रण करण्यात येत होते. यामुळे मिरवणुकीला वेगळीच रंगत आली होती. गुलालाची उधळण करत अनेक सर्वच जाती- धर्माचे युवक सहभागी झाले होते. विविध ठिकाणी भव्य दिव्य पेंडॉलमध्ये सजावट करण्यात आली होती. हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.