आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील शरणप्पा मलंग विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मंगळवारी(३) साजरी करण्यात आली शंभराहून अधिक मुलींनी सावित्री बाईच्या वेशभूषेत सावित्रीला अभिवादन केले. मुख्याध्यापक अजित गोबारे अध्यक्षस्थानी होते. प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक कविराज रेड्डी उपस्थित होते. सावित्रीचा वसा घेतलेल्या कुमारस्वामीच्या ज्येष्ठ शिक्षिका सरुबाई स्वामी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. प्रारंभी सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कु अदिती वाकडे हिने आपले विचार मांडले. यावेळी शिक्षिका स्वरूबाई स्वामी उतू नका मातू नका वसा सावित्रीचा अजिबात टाकू नका, असे आवाहन केले. यावेळी वैभवी सुरवसे, प्रांजल जाधव, श्रावणी माने, श्रेया बंडगर, आदिती पाटील, आरती पांगे, मधुरा सूर्यवंशी, योगिनी कटके, उम्मेअयमन शेख मनोगत व्यक्त केले. परमेश्वर सुतार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
तुरोरी विद्यालय
सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून तुरोरी येथील ज्ञानेश्वर विद्यालय येथे साजरी करण्यात आली. पर्यवेक्षिका अहिरे होत्या. यावेळी गणित शिक्षिका कल्पना जाधव, मुख्याध्यापक एन. एम. माने, उपमुख्याध्यापक बी. एस. जाधव उपस्थित होते. यावेळी शिंदे लिखित मुलगी वाचवा, मुलगी शिकवा एक अंकी नाटीका सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सावित्री बाई यांच्या जीवनपटावर ओव्या गाईल्या. काही विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. शिक्षक भोसले यांनी सावित्रीबाई च्या जीवनातील संघर्ष व कार्याची माहिती सांगून स्त्रियांचे शिक्षणातील योगदान व त्यांचे महत्त्व सांगितले. यावेळी शिक्षिका,शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कोरेगाव जि. प.शाळा
तालुक्यातील कोरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे जयंतीनिमित्त महिला पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. सरपंच राजश्री सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वजीत खटके, वैजिनाथ इंगळे, कोंडीबा भालेकरी, नेहा पाटील, सुप्रिया गायकवाड,सारिका वाघमोडे,अश्विनी वाघमोडे, पल्लवीताई लवटे, ज्योती पांगे, गिरिजा बंडगर व इतर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत सावित्रीच्या ओव्या गायील्या व नाटिका सादर केली.श्रेया खटके हिने सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक श्री स्वामी यांनी आभार मानले.
श्रमजीवी कॉलेज
श्रमजीवी अध्यापक महाविद्यालया शहरातील श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयात सावित्रीमाई यांची जयंती स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. विजय सरपे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन झाले. यावेळी प्राचार्य डॉ. सरपे यांनी सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्यावर माहिती सांगितले. यावेळी प्रा. सविता गिड्डे यांनी सावित्री बाई यांचा विचार आचरणात आणण्यासाठी प्रत्येक महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. ज्ञानेश्वरी मोकाशी यांनी प्रास्ताविक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.