आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम:उमरग्यातील शाळांमध्ये लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ यांना अभिवादन

उमरगा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठे यांनी बलशाली राष्ट्र निर्माण करण्याचे कार्य केले असून, युवकांनी त्यांच्या कार्य व विचारातून प्रेरित होवून समाज बदलासाठी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त सोमवारी (दि. १) राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष मोरे बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ. संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ. डी. व्ही. थोरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. जी. एन. सोमवंशी, कार्यालयीन अधीक्षक नितीन कोराळे उपस्थित होते.

महात्मा गांधी विद्यालय
श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त “हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी लोकमान्य टिळकांची स्वातंत्र्यनिष्ठा, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यप्रेम यावर माहिती दिली. यासाठी डी .एस सरवदे, बी. व्ही. सुरवसे, जी. व्ही. पवार व यांच्यासह अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कलदेव निंबाळा
तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे अण्णाभाऊ साठे जयंती अन लोकमान्य टिळक पुण्यतिथीदिनी अभिवादन करण्यात आले. सरपंच सुनीता पावशेरे अध्यक्षस्थानी होत्या.यावेळी विस्तार अधिकारी श्रीनिवास पाटील, सुनील पांचाळ, कलाकार पाटील उपस्थित होते.

महापुरुषांचे स्मरण करा
या वेळी बोलताना प्राचार्य डॉ. जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांनी महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी निमित्ताने त्यांचे स्मरण करून कार्याचे अनुकरण आपल्याही जीवनात करावे, असे आवाहन केले. या वेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...