आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यभार:भूम पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस निरीक्षकपदी साळवे

भूमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भूम पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस निरीक्षकपदी मंगेश साळवे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदभार स्विकारताच विविध पक्ष पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत स्वागत केले.पोलिस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे हे ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाल्याने सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांच्याकडे पोलिस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.

प्रभारी पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी यापूर्वी सहायक पोलिस निरीक्षक असताना भूम पोलिस ठाण्या अंतर्गत ५३ गावांचा एकच गणपती ठाण्यात बसवून ‘एक पोलिस ठाणे एक गणपती ‘ ही संकल्पना राबवली. लॉकडाऊनमध्ये कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी उत्कृष्ट कार्य केले. विविध संघटनांनी त्यांना सन्मानित केले आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांसह वकील, सामाजिक संघटनांनी भेट दिली. पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचा विश्वास साळवे यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...