आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुरुम:बसवराज पाटील यांना काशी पीठाकडून समाजभूषण पुरस्कार

मुरुम4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांना रविवारी (दि.३) काशी येथे समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जगद्गुरू विश्वाध्यान ज्ञान सिंहासन महापीठ, जंगमवाडी मठ, काशी यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. जगद्गुरू श्री डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी काशी जगद्गुरू पीठाचे उत्तराधिकारी म्हणून सोलापूर होटगी मठाचे महास्वामी श ब्र मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी यांची निवड केली आहे. यानिमित्त रविवारपासून (दि.३) काशी पीठ येथे देशातील विविध मठाचे मठाधिपती संत महात्म्यांच्या उपस्थितीत नूतन जगद्गुरुंच्या पट्टाभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ४२ दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत रविवारी (दि. ३) जंगमवाडी मठ काशी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जगद्गुरू श्री डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते पाटील यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी नूतन जगद्गुरु श्री डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी, श्री गंगाधर शिवाचार्य स्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा, काशी पिठाचे ट्रस्टी तथा उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, उद्योजक बाबासाहेब कल्याणी उपस्थित होते. याप्रसंगी जगद्गुरू विश्वाध्याय ज्ञान सिंहासन महापीठ, जंगमवाडी मठ, काशी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी, यासाठी पाटील परिवाराकडून सौर उर्जा प्लांट बसवून देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...