आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत समरजीतला दोन सुवर्णपदके

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे (पिंपरी चिंचवड) येथे आयोजित राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत जिल्हा आर्चरी संघटनेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. समरजित शिंदे याने ९ वर्षे वयोगटातून दोन सुवर्णपदक पटकावले तर तर १४ वर्षे वयोगटातून परिस पाटील याने चौथे स्थान पटकावले. त्यांची विजयवाडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी समरजित व परिस यांची महाराष्ट्र संघात निवड झाली.

९ वर्षाखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत कंपाउंड प्रकारात ७२० पैकी ७०३ पॉइंट्स घेत समरजीतने दोन सुवर्णपदक पटकावले. १४ वर्षाखालील कंपाउंड गटात परिस पाटील ६३१ पॉइंट्स घेत चौथ्या क्रमांकावर राहिला. जिल्हा धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रात जिल्हा आर्चरी संघटनेचे सचिव, मुख्य प्रशिक्षक प्रविण गडदे, अभय वाघोलीकर, नितीन जामगे ,कैलास लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...