आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्लेखनीय कामगिरी:डोंजा येथील समर्था सूर्यवंशी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी पात्र

डोंजा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा तालुक्यातील डोंजा येथील विद्यार्थिनी समर्था सूर्यवंशी हिने शनिवारी (दि.१७) लातूर येथे झालेल्या विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. तिने १९ वर्षाखालील गटात द्वितीय क्रमांक पटकावला.

यामुळे समर्था सूर्यवंशी ही राज्यस्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. ती संत मीरा स्कूल येथे शिक्षण घेत आहे. समर्था हिला कांबळे व संतोष भांडवलकर यांच्या मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत यशासाठी डोंजा क्रीडा समितीचे अध्यक्ष सतीश घोगरे, उपाध्यक्ष मुंडे यांनी अभिनंदन केले. या स्पर्धांमध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...