आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांचा संगमनेर बसस्थानकासमोर प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्याने १३ जणांवर जमाव बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता दुसऱ्या गटातील ४ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने शिवसेनेतील दुफळी समोर आली.
जिल्हा प्रमुख खेवरे यांनी शिवसेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर असताना तिला स्थगिती देण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे काही पदाधिकाऱ्यांनी दहन केले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार, तालुका प्रमुख जनार्दन आहेर, शहर प्रमुख प्रसाद पवार, युवासेना तालुकाप्रमुख गुलाब भोसले, अमोल कवडे, पप्पू कानकाटे, अशोक सातपुते, समीर ओझा आदींनी पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. कॉन्स्टेबल सचिन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी त्रिलोक कतारी, अजीज मोमीन, गोविंद नागरे, सीताराम सातपुते, सचिन साळवे, अमोल डुकरे, शोएब शेख, अक्षय बिल्लाडे, विकास डमाळे, अक्षय गाडे, विजय भागवत, वैभव अभंग, अन्य चौघे आदी १३ जणांवर गुन्हा दाखल केला होता.
दुसऱ्या गटातील उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुक्याचे नवीन पदाधिकारी नियुक्त झाल्यावर संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या विरोधात रायतेवाडी फाटा येथे घोषणाबाजी व त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. त्यांच्या फिर्यादीवरून प्रसाद जयवंत पवार (विद्यानगर), अमोल त्रिंबक कवडे (पावबाकी रोड), पप्पू नंदू कानकाटे, (इंदिरानगर), गुलाब पांडुरंग भोसले (बिरवाडी-साकूर) या चौघांवर रविवारी गुन्हा दाखल झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.