आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सांगोला नगरपरिषदेकडून अभियानाच्या प्रभावी प्रचार, प्रसारासाठी “हर घर तिरंगा” हे भारताच्या लष्करी, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी सामर्थ्याची ओळख करून देणारे गीत समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. सुभाष जगधने यांनी हे गीत गायले आहे. मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची ही संकल्पना आहे.
‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी लोकवर्गणीतून झेंडे उपलब्ध करून घेणे, तिरंगा स्वयंसेवक यांच्या नेमणुका करणे, अभियानात जास्तीत जास्त नागरिकांना जोडणे याची जबाबदारी या तिरंगा टास्क फोर्सवर सोपवली आहे. या टास्क फोर्समार्फत लोकवर्गणीतून ८००० झेंडे उपलब्ध करून घरोघरी जाऊन मोफत झेंडा वाटपाची व्यवस्था केली आहे. यापैकी ३५०० कुटुंबांना झेंडे वाटप झाल्याची माहिती केंद्रे यांनी दिली.
“हर घर तिरंगा” अभियानाच्या प्रभावी अंमलजावणीसाठी मुख्याधिकारी कार्यालयातील अधीक्षक अभिलाषा निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली “तिरंगा टास्क फोर्स” गठीत केली असून, यात लेखापाल विजयकुमार कहेरे, योगेश गंगाधरे, अमित कोरे, नयन लोखंडे, शरद चव्हाण यांचा समावेश आहे. देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रथमच शासकीय पातळीवरून ही संकल्पना राबविली जात आहे. प्रत्येक घरात तिरंगा झेंडा पाेहचावा यासाठी सरकारने दिशानिर्देश जारी केलेले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध शाळांनी रॅली काढली. या रॅलींना चांगला प्रतिसाद मिळाला.
‘हर घर तिरंगा’ प्रभावी प्रचारासाठी हे गीत
“हर घर तिरंगा” अभियानाच्या प्रभावी प्रचारा साठी हे गीत तयार केले असून यातून नागरिकांनी प्रेरणा घेऊन ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या आठवणी जाग्या करून देशाभिमान जागृत करण्यासाठी दि. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान आपल्या घरावर, दुकानावर, शासकीय तसेच खासगी कार्यालयांवर ध्वज संहितेचे पालन करून नगरपरिषदेमार्फत उपलब्ध करून दिलेला तिरंगा फडकवून “हर घर तिरंगा” अभियान यशस्वी करायचे आहे.अमृतमहोत्सवाचा हा कार्यक्रम आहे.
कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.