आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:भाजपच्या अध्यात्मिक आघाडी जिल्हा संयोजकपदी संजय बोंदर

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी सामाजिक कार्यकर्ते संजय बोंदर यांची निवड करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी बोंदर यांची नियुक्ती केली आहे. तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बोंदर यांना निवडीचे पत्र दिले.

याप्रसंगी मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण नन्नवरे, सतीश बोबडे, शांताराम पेंदे, शिवाजी बोधले, आनंद कंदले, राजेश शिंदे, सचिन घोडके आदींची उपस्थिती होती. बोंदर यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगा प्रशिक्षक तसेच तुळजाभवानी मंदिर परिसर बाल भिक्षेकरी मुक्त करण्यात योगदान दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...