आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद:शालेय मुलींना 2000‎ सायकल देण्याचा संकल्प‎

धाराशिव‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती‎ अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या‎ सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले‎ जात असून यास महिलांचा देखील‎ उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. राज्य‎ सरकार याबाबत सकारात्मक असून‎ महिलांसाठी विशेष योजना राबवीत‎ आहे. अनेक मुलींना गावात माध्यमिक‎ शाळेची सोय नसल्याने शाळेत‎ जाण्यासाठी काही किलोमीटर पायपीट‎ करावी लागते.

त्यामुळे त्यांची होत‎ असलेली गैरसोय दूर करण्यासाठी‎ माध्यमिक शाळेतील मुलींना सीएसआर‎ माध्यमातून २००० सायकल उपलब्ध‎ करून देण्यात येणार असल्याची माहिती‎ आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब‎ यांनी उमेद अंतर्गत जागतिक महिला‎ दिनाचे औचित्य साधून आयोजित‎ केलेल्या कार्यशाळेत बोलताना दिली.‎

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,‎ आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर‎ धाराशिव, योजने अंतर्गत‎ युवक-युवतींना रोजगार‎ स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून‎ देण्यासह चालू व्यवसाय वृद्धिंगत‎ करण्यासाठी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रोजगार निर्मिती योजनांच्या माध्यमातून‎ विशेष प्रयत्न केले जात आहेत. अनेक‎ महिलांनी या अंतर्गत प्रस्ताव दाखल‎ केले असून स्वतःचे उद्योग देखील सुरू‎ केले आहेत. उमेद गटातील जास्तीत‎ जास्त महिलांनी या योजनांचा लाभ‎ घ्यावा व अडचणी आल्यास संपर्क‎ साधण्याचे आवाहन केले. शासनाच्या‎ विविध योजनांची माहिती महिलांना‎ व्हावी यासाठी योजनांची माहिती‎ पुस्तिका तयार करण्यात येत आहे.‎ यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन‎ काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य‎ दत्ताभाऊ कुलकर्णी, अॅड.कल्पना‎ निपाणीकर, उमेदचे जिल्हा अभियान‎ व्यवस्थापक डॉ. बलवीर मुंडे, जिल्हा‎ ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प‎ संचालक प्रांजल शिंदे यांच्यासह महिला‎ उपस्थित होत्या.‎

बातम्या आणखी आहेत...