आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या पीएम सन्मान योजनेतील पैशांचा अपहार करणाऱ्या अजय चौरे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी छापा टाकून १८ लाख रुपये जप्त केले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या टोळीचा म्होरक्या कोण, याचा शोध पोलिस घेत आहेत. पीएम किसान सन्मान योजनेतील रक्कम परस्पर काढून परंडा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची दोन तरुणांनी फसवणूक केली आहे.
त्यापैकी अजय चौरे याला पोलिसांनी अटक केली असून त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीने गुन्हा कबुल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अमोद भुजबळ यांनी दिली. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अमोद भुजबळ यांनी सपोनि कविता मुसळे, पोकॉ मुलाणी यांच्या पथक नियुक्त केले होते. पथकाने अजय चौरे याला २४ तासात केज तालुक्यातून ताब्यात घेतले. चौरे याच्या घरातून १८ लाख रोख, संगणक संच, विविध कंपनीचे मोबाइल व सीम कार्ड, धनादेश बुक आदी कागदपत्र जप्त केली आहेत.
आरोपींकडे लाभार्थी यादी कशी
परंडा तालुक्यातील पीएम किसान सन्मान निधी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी व मोबाइल क्रमांक या आरोपींकडे कसे आले, याचे गुढ कायम आहे. या टोळीत परंडा येथील कोणाचा सहभाग आहे का? तसेच बँकेचे सर्व एटीएम आरोपींकडे कसे आले, यात फिनो बँकेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का? या टोळीचा म्होरक्या कोण आहे व त्यात किती लोकांचा सहभाग आहे, याचा पोलिस तपास करताहेत.
चार दिवसांची पोलिस कोठडी
आरोपी अजय चौरे याला परंडा येथील न्यायालयात हजर केले असता त्याचा चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस निरीक्षक अमोद भुजबळ, सहायक पोलिस निरीक्षक कविता मुसळे, पोकॉ मुलाणी यांच्या पथकाने दोघांपैकी एका आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे पुढील धागेदोरे लवकरच हाती लागतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.